Ad will apear here
Next
‘जीएसटी अधिक सुलभ करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील’
‘आयसीएआय’ आणि ‘डब्ल्यूएमटीपीए’तर्फे परिसंवाद
‘ज्ञानसंगम २०१८’ या परिसंवादाचे दीप्रज्वलन करून उद्घाटन करताना डावीकडून अॅड. गोविंद पटवर्धन, अभिषेक धामणे, ऋता चितळे, राजेश पांडे, नवनीतलाल बोरा, नरेंद्र सोनावणे व अॅड. मिलिंद भोंडे.

पुणे : ‘गेल्या सव्वा वर्षाच्या काळात वस्तू व सेवा कर (जीएसटी) आणि रिअल इस्टेट रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी (रेरा) या दोन्ही कायद्याची अंमलबजावणी बऱ्याच अंशी यशस्वी झाली आहे. यामध्ये लेखापाल (सीए) आणि कर सल्लागार यांनी घेतलेली मेहनत महत्त्वाची आहे. या दोन्ही कायद्यात काही अडचणी येत आहेत. त्यासाठी येत्या काळात त्यामध्ये सुधारणा करून जीएसटी अधिक सुलभ करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,’ असे प्रतिपादन केंद्रीय ‘जीएसटी’ विभागाचे अतिरिक्त महासंचालक राजेश पांडे यांनी केले.

दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाँटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे विभाग व दी वेस्टर्न महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशर्न्स असोसिएशन (डब्ल्यूएमटीपीए) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जीएसटी आणि रेरा’ या विषयावरील ‘ज्ञानसंगम २०१८’ या एक दिवसीय परिसंवादाचे आयोजन कार्यात आले होते. त्या वेळी पांडे बोलत होते. पुणे स्टेशनजवळील हॉटेल शेरेटॉन ग्रँड येथे झालेल्या या कार्यक्रमाला पुणे ‘आयसीएआय’च्या उपाध्यक्षा व ‘ज्ञानसंगम २०१८’च्या प्रमुख समन्वयक सीए ऋता चितळे, ‘डब्ल्यूएमटीपीए’चे माजी अध्यक्ष नरेंद्र सोनवणे, अध्यक्ष नवनीतलाल बोरा, 'आयसीएआय'चे सचिव राजेश अग्रवाल, खजिनदार अभिषेक धामणे, अॅड. मिलिंद भोंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

राजेश पांडेपांडे म्हणाले, ‘जीएसटी आणि ‘रेरा’ या कायद्यांत सतत बदल करावे लागत आहेत. हे बदल स्वीकारून कर सल्लागार, सीए आणि करदाते यांनी एकत्रितपणे यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत. राज्य आणि केंद्र सरकारतर्फे अशा संस्थांना बरोबर घेऊन ‘जीएसटी’तील बदलांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जावा. कर भरणाऱ्यांनी वेळेत कर भरावा. आधी दिरंगाई होते आणि मग तारखा वाढवून द्याव्या लागतात. त्याचा अतिरिक्त ताण यंत्रणेसह सगळ्यांवरच पडतो.’

‘कर सल्लागारांनी करदात्याची सगळी दुःखे आपल्या खांद्यावर घेऊन त्यांना उद्योग वृद्धीसाठी लक्ष केंद्रित करण्यास वेळ द्यावा. त्यासाठी कायद्यातील बदलांचे ज्ञान आपण घेऊन त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी करावी. येत्या काळात सर्वांकडून अभिप्राय मागवून ‘जीएसटी’मध्ये आणखी बदल केले जातील. जेणेकरून जीएसटी ‘गुड अँड सिंपल टॅक्स’ बनेल आणि करप्रणाली अधिक सुकर होईल,’ असेही पांडे यांनी नमूद केले.



परिसंवादात ‘जीएसटी’ व ‘रेरा’ यासंदर्भातील नवीन कायदे समज गैरसमज, यादरम्यान येणारा मानसिक ताणतणाव यावर मार्गदर्शन सत्रे झाली. यामध्ये सीए केल्विन शहा यांनी ‘वार्षिक कर परतावा आणि जीएसटी ऑडिट’, ज्ञानवत्सल स्वामी यांनी ‘ताणतणाव व्यवस्थापन’, तर अॅड. रतन शामल यांनी ‘रेरा : पुनर्विकासातील अडचणी’ या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी झालेल्या चर्चासत्रात अॅड. मिलिंद भोंडे, अॅड. अभय बोरा, सीए प्राजक्ता शेट्ये-देव व सीए यश नागर यांनी सहभाग घेतला.

नवनीतलाल बोरा यांनी मनोगत व्यक्त केले. नरेंद्र सोनावणे यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. सीए ऋता चितळे यांनी परिसंवादाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. अॅड. भोंडे यांनी आभार मानले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZMKBT
Similar Posts
टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनतर्फे ‘जीएसटी’ अभ्यासक्रम पुणे : ‘दि वेस्टर्न महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनतर्फे (डब्ल्यूएमटीपीए) वस्तू व सेवा कर (जीएसटी) या विषयावरील प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध होणार आहे. हा अभ्यासक्रम दोन महिन्यांचा असून, त्याची सुरुवात आठ डिसेंबर २०१८ पासून होत आहे’, अशी माहिती असोसिएशनचे मुख्य संयोजक व माजी अध्यक्ष नरेंद्र सोनावणे,
‘सनदी लेखापालांमुळे ‘जीएसटी’ संकलनात मोठी वाढ’ पुणे : ‘वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आपल्या सगळ्यांच्या सोयीसाठीच आणलेला आहे. त्यामध्ये सुधारणेला वाव असून, त्यासाठी जीएसटी कौन्सिल नियमित बैठक घेऊन ‘जीएसटी’ला ‘गुड अँड सिम्पल टॅक्स’ बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे. ‘जीएसटी’मुळे कर संकलनात मोठी वाढ झाली आहे,’ असे प्रतिपादन ‘सीजीएसटी’च्या मुख्य आयुक्त कृष्णा मिश्रा यांनी केले
‘सीए सामाजिक, आर्थिक विकासाचे प्रतिनिधी’ पुणे : ‘प्रामाणिक करदात्यांना न्याय मिळावा, यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. सामाजिक-धार्मिक संस्थानीही प्राप्तिकरातील तरतुदी समजून घेत वेळेवर लेखा परीक्षण करावे. त्यासाठी लेखापालांनी (सीए) पुढाकार घ्यावा. कारण तेच सामाजिक व आर्थिक विकासाचे प्रतिनिधी आहेत,’ असे प्रतिपादन दिल्ली येथील मुख्य
‘लेखापालन क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध’ पुणे : ‘सनदी लेखापाल झाल्यानंतर नोकरी, स्वतंत्र व्यवसाय आणि इतर अनेक क्षेत्रांत काम करता येते. लेखापालन क्षेत्रात करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. कठोर मेहनत, सातत्य आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर ‘सीए’सारख्या आव्हानात्मक परीक्षेत यश संपादन करू शकतो,’ असे मत ज्येष्ठ सनदी लेखापाल आणि दी इन्स्टिट्यूट

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language